भुलेश्वर बरेच दिवस मनांत होतं पण होत नव्हतं शेवटी एप्रिल महिन्यात एका रविवारी जमवलंच. प्रदीप, आदित्य आणि सचिन लब्दे निघाले. रात्री च्या ट्रेनने पुणे गाठलं , सकाळी सासवड आणि सासवड ते यवत साधारण २ तास लागतो. ( स्वताच वाहन नेण चांगल )
यवतच्या अलीकडे - पूण्याकडुन सोलापुर कडे जाताना, उजवीकडे एक कालव्याच्या बाजुने रस्ता आत जातो, तोच रस्ता भुलेश्वरकडे जातो. एकदा उजवीकडे वळलं की सतत एक टेलिफोन टॉवर दिसत राहतो. तोच आपल्याला गाठायचा असतो हे लक्षात ठेवा. खबरदारी या गोष्टीची घ्यावी लागते की, शेवटचा घाट हा फार अवघड आहे, फक्त एक म्हणजे एकच चार चाकी जाउ शकते.
आता मंदिरा बद्दल - हे एका टेकडीवर असलेल्या पठारावर आहे. बाहेरुन मंदिर मोठ्या वाड्यासारखे दिसते. उन्हातुन आत गेलात तर वाटेल की समोर मुर्ती पण नाही आणि सग़ळा अंधार आहे. या अंधाराला थोडे डोळे सरावले की डाव्या बाजुला पहा एक दिड फुटी या मापाच्या ४ पाय-या आहेत.
त्या चढुन वर गेलात की मग आधी लक्ष जातं ते या नंदीकडे. अतिशय रेखीव्,प्रमाणबद्ध खुप मोठा आहे.
No comments:
Post a Comment